आठवड्यात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ

पुढील आठवडयात साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असलेल्या गुढीपाडवा सण आहे. या सणाच्या तोंडावर सोने व चांदीच्या दराने उच्चांक केला आहे. मंगळवारी (२ एप्रिल) सोने १० ग्रॅमला ७१ हजार रुपये तर चांदी किलोला ७८२०० रुपये झाली आहे. महिन्यात सोने ७१०० रुपयांनी तर चांदी किलोमागे ६८०० रुपयांनी महागली आहे. गुढीपाडवा व लग्नसराई असल्याने, सोने-चांदीचा दर तेजीमध्येच राहणार आहे. मागील मार्च महिन्यामध्ये सोने ६३९०० तर चांदी ७१४०० रुपये असा दर होता. या एका महिन्यामध्ये सोने ७१००० तर चांदी ७८२०० रुपये झाली आहे. मागील आठवडयातील दरामध्ये सोने २६०० व चांदी २३०० रुपयांनी महागली आहे. मागील बुधवारी सोन्याचा दर ६८४०० तर चांदीचा दर ७५९०० रुपये असा होता.

error: Content is protected !!