हजगोळी खून प्रकरणातील दुचाकी सापडली

तुडये: हजगोळी ता. चंदगड येथील काजू बागेत गेलेल्या शेतकरी वसंत पाटील यांचा २६ मार्च रोजी गळा चिरून तसेच हाता पायावर वार करून खून करण्यात आला. यावेळी संशयितानी मृतदेह, त्यांची दुचाकी लंपास केली होती. सात दिवसाने सोमवारी मोटर सायकल बिजगरणी, किनये ता. बेळगांव रस्त्याच्या आतमध्ये काही अंतरावर सापडली. चंदगड पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक शेखर बारामती, अमोल पाटील व तपासणी पथकाने मोटर सायकल ताब्यात घेतली.

error: Content is protected !!