इचलकरंजीतील दुचाकी चोरणाऱ्यास अटक

इचलकरंजी : शहरातील गावभाग पोलिसांनी एका दुचाकी चोरट्यास अटक केली. विवेक विशाल साळुंखे (रा. नदीवेस नाका, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून गावभाग आणि शिवाजीनगर या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले. दोन दुचाकी जप्त केल्या. ही कामगिरी गावभाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे, अशी माहिती गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापूरे यांनी दिली.
गावभाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक हद्दीत गस्त घालीत होते. यावेळी संशयीत आरोपी विवेक साळुंखे सांगली रस्त्यावर सुमारे दुचाकी घेवून संशयास्पदरित्या फिरत असताना पकडले. त्याच्याकडे कसून चौकशी सुरु केली. चौकशी दरम्यान त्याने गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखीन एक दुचाकीची चोरी केल्याचे सांगितले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

error: Content is protected !!