अनोळखी पुरूषाचा मृतदेह

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीकाठावरील रेणुका मंदिरजवळ एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला. अंदाजे ४५ वर्षे वयाच्या या मृतदेहाच्या तोंडाचे भटकी कुत्री लचके तोडत होते. ही माहिती मिळताच माणुसकी फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळवून मृतदेह आयजीएम रुग्णालयात नेला. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात. नोंद झाली आहे. पंचगंगा नदीकाठावर पुरुष जातीचा बेवारस मृतदेह पडला असल्याची माहिती माणुसकी फौंडेशनचे कार्यकर्ते इम्रान शेख यांना मिळाली. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच याबाबत शिवाजीनगर पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह आयजीएम रुग्णालयात नेण्यात आला.

error: Content is protected !!