तुळशी नदीत आढळला महिलेचा मृतदेह

       धामोड (ता. राधानगरी) येथे तुळशी नदीवर असणाऱ्या को.प. बंधाऱ्याच्या खालील बाजुस रविवारी सकाळी सुरेखा एकनाथ चव्हाण ( रा धामोड – वय ४०) या महिलेचा मृतदेह आढळुन आला. घटनेची वर्दी मयताचे चुलत दिर आनंदा चव्हाण यांनी राधानगरी पोलिसात दिली.

घटनास्थळावरून व पोलिसांतुन मिळालेली माहिती अशी की, मयत सुरेखा सकाळी घरातून बाहेर पडल्या होत्या. त्या लवकर घरी न आल्याने पती एकनाथ व चुलत दिर आनंदा तिचा शोध घेत धामोड येथील तुळशी नदीजवळ आले असता मयत सुरेखा हिचा पांढ-या रंगाचा स्कार्फ व चप्पल नदीकाठी दिसुन आले. पाण्यामध्ये शोध घेतला असता मयत सुरेखाची ओळख पटली. पुलाच्या पूर्वेस कडेला विवाहितेचा मृतदेह पाण्यात दिसून आला. त्यानंतर धामोडचे पोलिस पाटील महादेव फडके यांनी सदर घटनेची कल्पना राधानगरी पोलिसांत दिली. पोलिस उपनिरिक्षक विजयसिंह घाडगे, पो.काँ. गजानन गुरव, पो.ना. डी.जे. शिंदे, पो.कॉ. लता कुंभार यांनी घटनास्थळी पंचनामा केला. ग्रामिण रुग्णालय राधानगरी येथे उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेची आकस्मिक म्हणुन नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे. मयत सुरेखा यांच्या पश्चात पती, दिर, भावजय, असा परिवार असुन अधिक तपास राधानगरी पोलिस करीत आहेत.

error: Content is protected !!