बॉलिवूडच्या गब्बरला करोनाची लागण

मुंबई/प्रतिनिधी

     मागच्या काही दिवसांपासून देशभरात करोना (corona) व्हायरसचं संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. याचा मोठा फटका मनोरंजन विश्वाला बसला आहे. मागच्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी करोना व्हायरसची शिकार झाले आहे. त्यात आता अभिनेता अक्षय कुमारची सुद्धा भर पडली आहे. अक्षय कुमारनं (Akshay Kumar) त्याला करोना झाल्याची माहिती सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून दिली.

      सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या अक्षयनं त्याचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (corona positive) आल्याची माहिती इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिली. अक्षयनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘नुकतीच माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून मी स्वतःला घरीच क्वारंटाइन केलं आहे. मी स्वतःची सर्व काळजी घेत आहे आणि करोना संबंधिच्या नियमांचं पालन करत आहे. जे लोक मागच्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आले आहेत त्या सर्वांना विनंती आहे की, त्यांनी स्वतःची करोना चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. मी लवकरच परत येईन.

error: Content is protected !!