बनावट सोने गहानवट ठेवून कर्ज घेतले

युनियन बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेला ५७ लाखांवर गंडा

कोल्हापूरातील लक्ष्मीपुरी येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बनावट सोने गहानवट देवून कर्जाची उचल करून बँकेस ५७ लाख १८ हजार ३७१ रूपयांस गंडा घातल्याचे शुक्रवारी उघड झाले. याप्रकरणी बँकेचा अधिकृत मूल्यांकणकार आणि कर्जदार असे एकूण २३ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

यातील सागर अनिल कलघटगी ( वय ३८ रा. धनवडे गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर), श्रावण विजय हळदणकर (वय २५, जैनमठ गल्ली, शुक्रवार पेठ शनिवार पेठ, कोल्हापूर), गोपीनाथ बाळासाहेब शेडगे (३२ रा. रेडेकर गल्ली, लक्षतिर्थ वसाहत, कोल्हापूर), ओंकार प्रकाश शिंदे (वय २०, रा. म्हाडा कॉलनी, एसएससी बोर्ड जवळ, राजेंद्र नगर, राजारामपुरी, कोल्हापूर), सुजल रविंद्र शिंदे,( वय १९ रा. म्हाडा कॉलनी, राजेंद्र नगर, एसएससी बोर्डाजवळ, कोल्हापूर), तुषार विजय जाधव (वय ३२, रा. जाधव गल्ली, जाधववाडी, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सतीश बाळकृष्ण पोतदार (रा. संभाजी नगर, देवकर पाणंद, कोल्हापूर), रजनीकांत बाबुराव वडगावकर (रा. तेली गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर), युवराज महादेव बसुगडे (रा. शिंदे गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर), रोहीणी राजेंद्र पाटील (रा. वळीवडे गल्ली, तळसंदे), उर्मिला मंगेश पाटील (रा. बोडके गल्ली, जुना शुक्रवार पेठ कोल्हापूर), मारुती सखाराम कोल्हटकर (रा. पाटील कॉलनी, मणेर मळा, उंचगाव), स्वलिया इकबाल सरकवास (रा. डंगरी बोळ, शुक्रवार पेठ, कोल्हापूर), सतीश बम्हदेव कांबळे (रा. हरीजन वाडा, कुरकली बेले), साऊ सखाराम कोल्हटकर (रा. पाटील कॉलनी, मणेर मळा, उचगांव), असिफ नुरमहोम्मद सरखवास (रा. सरखवास कॉलनी, सरनाईक वसाहत जवळ, जवाहर नगर, कोल्हापूर),

यश राजेश भुते (रा. एस टी कॉलनी, बळवंत तारा अपार्टमेंट, राजारामपुरी, कोल्हापूर) उज्वला संताेष रणवरे (रा. विक्रम नगर, कोल्हापूर), सागर राजन चावरे (रा. ओम गणेश कॉलणी, संभाजी नगर, कोल्हापूर), प्रथमेश प्रमोद संकपाळ ( रा. गरगाटे गल्ली, मु. पो. कोथळी, कोल्हापूर), सादीक शिंकदर शेख (रा. प्रियदर्शनी कॉलनी, कबनूर), विकास सुरेश जाधव (रा. मधली गल्ली, घानवडे), संग्राम दत्तात्रय सावंत (रा. हनुमान मंदिर सावंत गल्ली, शिंदेवाडी, फणसवाड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मार्च २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या दरम्यान ही फसवणूक झाली आहे. यातील सागर कलघटगी हे बँकेचे अधिकृत मूल्यांकनकार होते. उर्वरित २२ जणांनी कर्जाची उचल केली. यांच्या विरोधात बँकेचे मुख्य व्यवस्थापक दिपक कुमार रविंद्र प्रसाद साह ( वय ४२, मूळ : बिहार, सध्या रा. अंबाई टँकजवळ, रंकाळा, कोल्हापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली.

error: Content is protected !!