ब्रेक द चेन आदेशाचा भंग ; प्रियदर्शनी पॉलीपॅक्स कंपनीवर दंडात्मक कारवाई

कोल्हापूर / (जिमाका)

     ‘ ब्रेक द चेन ‘ आदेशाचा भंग केल्याने हातकणंगले तालुक्यातील शिरोली एमआयडीसीमधील प्रियदर्शनी पॉलीपॅक्स या कंपनीवर 25 हजार रुपयांचा दंड करण्यात आला असल्याचे हातकणंगलेचे तहसिलदार प्रदीप उबाळे यांनी सांगितले आहे. ब्रेक द चेन आदेशाचा भंग व कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्यामुळे मंडळ अधिकारी हेरले भरत जाधव व विभागातील तलाठी यांच्या पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

error: Content is protected !!