सचिन वाझे यांची तात्काळ बदली होणार- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई/ प्रतिनिधी

    मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren death case) प्रकरणावरून अधिवेशनात (Maharashtra Budget 2021) भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेत पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin waze) यांच्या निलंबनाची मागणी केली होती. अखेर महाविकास आघाडी सरकारने (MVA Goverment) एक पाऊल मागे घेतले आहे. सचिन वाझे यांची तात्काळ बदली करण्यात येणार अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली.

    अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याच्या कायद्या सुव्यवस्थेच्या मुद्यावर निवेदन सादर केलं. पण, भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सचिन वाझे यावर काय भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी लावून धरली. भाजपच्या आमदारांनी एकच गोंधळ घातला.

error: Content is protected !!