शून्यातून विश्व निर्माण व सदैव समाजसेवेचे व्रत जोपासणारे उद्योगपती संजय घोडावत

उद्योगपती संजय घोडावत वाढदिवस विशेष

      महाराष्ट्रातील अनेक उद्योगपतींनी भारताचे नाव जगभरात पोहचवले आहे. अनेकांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर असाध्य अशी कामगिरी करून दाखवली आहे. त्यापैकीच एक म्हणजे उद्योगपती संजय घोडावत . संजय घोडावतांनी अपार कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे. तसेच समाज हिताला अनुसरून ज्या वेळी कोल्हापूर व सांगलीकरांना गरज भासेल, त्या वेळी मदतीस धावून गेले आहेत, त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली पट्ट्यात प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावतांचं नाव नेहमीच आदरानं घेतलं जातं.

  घोडावत यांचा संघर्षमय जीवनप्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. घोडावत ग्रुपचा पाया रचून छोट्याशा झाडाचं वटवृक्षात रुपांतर करणारे संजय घोडावत यांनी विद्यापीठाची केली. शून्यातून विश्व उभे करणारे उद्योगपती म्हणून संजय घोडावतांचं नाव आहे. संजय घोडावत फाऊंडेशन नेहमीच समाजातील उपेक्षित घटकांना मदत करण्यासाठी तत्पर असते. फाऊंडेशनने आजवर अंध-अपंग शाळा, पूरग्रस्त, अनाथालये, दुष्काळग्रस्त शेतकरी, वृद्धाश्रमे, शहीद जवानांचे कुटुंब, आरोग्य केंद्रे, सेवाभावी संस्था, राष्ट्रीय खेळाडू, गरीब गरजूंना मदतीचा हात पुढे करून सामाजिक भान जपलेय.
  घोडावत ग्रुपचा विस्तार करत आज संजय घोडावतांनी अनेक क्षेत्रात जोरदार प्रगती केलीय. घोडावत अॅग्रो, घोडावत एव्हिएशन, घोडावत कन्झ्युमर प्रोडक्ट, घोडावत एनर्जी, घोडावत फूड, घोडावत मायनिंग, घोडावत रिएल्टी, घोडावत सॉफ्टटेक, घोडावत टेक्सटाईल, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, स्टार एअर कनेक्टिंग रिअल इंडिया, अशा विविध क्षेत्रात संजय घोडावतांनी नावलौकिक मिळवलेला आहे.

     विशेष म्हणजे कोल्हापूर आणि सांगलीला पुरानं वेढलेले असताना त्यांनी मदतीचा हात पुढे केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी 51 लाखांच्या मदतीचा धनादेश दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिला होता. पूरग्रस्तांना अन्न, कपडे व निवारा इत्यादी मदत युद्धपातळीवर पुरविली. याचबरोबर शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देऊन त्यांना पाठबळ दिले. तसेच अनाथालय, वृद्धाश्रम, खेळाडू, आरोग्यकेंद्रे अशा अनेक सेवाभावी संस्थांना मदत करून आपल्या सामाजिक कार्याचा वारसा जोपासला आहे. फाऊंडेशनमार्फत कोरोनासारख्या महाभयंकर काळात जवळपास 5 लाखांहून अधिक लोकांना मोफत अन्न पुरविले. इतर वैद्यकीय किटसुद्धा गरजूंना वितरित करण्यात आले. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 44 जवानांच्या कुटुंबीयांना विभागून एकूण 51 लाखांची मदत फाऊंडेशनतर्फे करण्यात आली होती.
केरळ आणि कर्नाटक राज्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती, त्यावेळी कृषिक्षेत्रालाही मोठा फटका बसला होता. पुरामुळे तेथे रोगराई देखील पसरली. अशा कठीण परिस्थितीत घोडावत ग्रुपने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पूरग्रस्त भागात जाऊन मोफत अन्नाची पाकिटे, कपडे व औषधे पुरविली. या माध्यमातून घोडावत ग्रुपने पूर क्षेत्रात अडकलेल्या लोकांना मदतीचा हात पुढे केला.
समाजातील प्रत्येक घटकांच्या मदतीसाठी पुढे असलेल्या संजय घोडावतांनी अनेक निराधार वृद्ध, पुरुष व महिलांना मायेचा आसरा दिला. तसेच त्यांच्यासाठी सेवा देणाऱ्या माऊली केअर सेंटरला संजय घोडावत फाऊंडेशनने सीएसआर फंड स्वरूपात कायमस्वरूपी मदत करण्याचे ठरविले. यामध्ये निराधार वृद्धांसाठी अन्न-पाणी आणि त्यांच्या देखभालीचा सर्व खर्च संजय घोडावत फाऊंडेशनने उचलला.

      संजय घोडावत फाऊंडेशन देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या शहिदांच्याप्रति नेहमीच संवेदनशील राहिलंय. सरकारी मदत मिळेल याची वाट न बघता फाऊंडेशन नेहमीच अशा कुटुंबीयांच्या मदतीस धावून आले. आजवर कित्येक शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून त्यांना मायेचा उबारा देण्याचे कार्य संजय घोडावत यांनी केले. सियाचीनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेले हनुमंतअप्पा, कुपवाडात अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले आंबोलीतल्या मुळवंडवाडीचे पांडुरंग गावडे, सीमेवर लढताना धारातीर्थी पडलेले शहीद चंदगड तालुक्यातील कर्वे गावचे सुपुत्र राजेंद्र तुपारे यांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी 5 लाखाची मदत दिली. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले होते. संजय घोडावत ग्रुपच्यावतीने या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना थेट 51 लाखाची मदत त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली
कोरोना काळात गतवर्षी कोल्हापूर जिल्ह्याला सर्वात मोठे क्षमतेचे कोव्हिड सेंटर लाभले ते म्हणजे संजय घोडावत विद्यापीठाचे. घोडावत विद्यापीठात असणाऱ्या कोव्हिड सेंटरची तिथल्या सोयी-सुविधांमुले जिल्ह्यात चर्चा झाली. विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी दूरदृष्टीने या इमारती बांधल्या असून, कोव्हिड रुग्णांना विलागीकरणासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा प्रत्येक रूममध्ये देण्यात आल्या होत्या. याचबरोबर 24 तास वीजपुरवठा आणि मिनरल वॉटरची देखील सुविधा दिली.
     संजय घोडावत ग्रुप सातत्याने आज 15 वर्षे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड या संस्थेला या सामाजिक उपक्रमात सहकार्य करीत असून, मिरज याठिकाणी अंधशाळा अखंडरीतीने चालवीत आहेत. या शाळेतून आजवर जवळपास 1000 हून अधिक विद्यार्थी आपले शिक्षण घेऊन बाहेर पडलेत आणि ते आज विविध संस्थांमध्ये नोकरी देखील करीत आहेत. काही माजी विद्यार्थ्यांनी स्वरगंधार नावाचा म्युझिक बॅंड स्थापित करून आज पुण्यासारख्या ठिकाणी आपले अस्तित्व निर्माण केले. विद्यार्थ्यांचे अन्न-पाणी व त्यांच्या देखभालीचा सर्व खर्च संजय घोडावत फाऊंडेशन करीत आहे. या अंधशाळेमध्ये दोन वेळ अल्पोपहार आणि दोन वेळ जेवण विद्यार्थ्यांना दिले जाते. या कार्याबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांना नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, सांगली या संस्थेतर्फे “अंधमित्र ” पुरस्काराने गौरविण्यात आले.

     आपल्या सामाजिक कार्यात अग्रेसर राहुन सदैव जनसेवेचा ध्यास घेतलेले उद्योगपती संजय घोडावत यांचा 59 वा वाढदिवस.  वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!