श्री दत्त तर्फे डॉ. सा. रे. पाटील यांना आदरांजली

शिरोळ

कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते, श्रीदत्त कारखान्याचे संस्थापक संचालक, माजी चेअरमन, माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त श्रीदत्त कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोरील पुतळ्यास आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी सा. रे. पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन कैले. दत्ताजीराव कदम अण्णांच्या पुतळ्यास व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई यांनी पुष्पहार अर्पण केला. दिनकरराव यादव यांच्या पुतळ्यास संचालक रणजीत कदम व विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुतळ्यास दरगू माने-गावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी जि. प. सदस्य अशोकराव माने, पंचगगा कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील, उद्योगपती मयूरभाई नाचरिया, संचालक अनिलकुमार यादव, रघुनाथ पाटील, विश्वनाथ माने, बाबासो पाटील, शेखर पाटील, प्रमोद पाटील, बसगुंडा पाटील, इंद्रजीत पाटील,
शरदचंद्र पाठक, अमर यादव, निजामसू पाटील, संचालिका विनया घोरपडे, यशोदा कोळी, संगीता पाटील (कोथळीकर), तज्ज्ञ संचालक महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, निमंत्रित मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील, रावसाहेब नाईक, कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप बनगे, धनाजी पाटील-नरदेकर, अमर कदम, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सेक्रेटरी अशोक शिंदे, चीफ अकाउंटंट संजय भोसले, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना, प्रोडक्शन मॅनेजर विश्वजीत शिंदे, पंडित काळे, डॉ. अरविंद माने, पुंडलिक महात्मे, सर्पमित्र अनिल माने, गजानन सावंत, वरूण पाटील, मुसा डांगे, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, विनोद शिरसाट, डॉ. सा. रे. पाटील सोशल फाउंडेशन, श्रीदत्त कामगार सोसायटी कामगार कल्याण मंडळ, शर्करा उद्योगिक श्रमिक संघ या संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!