कबनुर /ता : २७ प्रतिनिधी
लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिलेनंतर पहिल्याच दिवशी कबनुर मधील स्वस्त धान्य दुकानासमोर रेशन कार्ड धारकांची प्रचंड गर्दी झाली होती.धान्यासाठी पुरुष,महिला,वयोवृद्ध,लहान मुले त्या गर्दीत दिसत होती. मोफत धान्यासाठी समुह संसर्गाला खुले निमंत्रण देत सोशल डिस्टणशिंगसह शासनाच्या सर्वच नियमांचा फज्जा उडाला होता.त्यामुळे ज्या त्या परिसरातील रेशनकार्ड धारकांना त्याच परिसरातील रेशनधान्य दुकानांतून धान्य वाटप करण्याची सोय करावी . अशी मागणी होत आहे.

शहराबरोबरच कबनूर परिसरात महिन्याचा कालावधी लोटला तरी कोरोनाची शृंखला अखंडित राहिली आहे. आजअखेर बाधितांची संख्या ३१ असून त्यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रशासनाकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना आखल्या जात आहेत.परंतु धान्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे समुह संसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील पात्र शिधापत्रिकाधारकांची उपासमार होऊ नये . म्हणून माहे एप्रिलपासून गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य योजना सुरु आहे. मात्र पात्र शिधापत्रिकाधारकांच्या
कबनुरमधील रेशनधान्य दुकानातील कार्डच्या संख्येत मोठी तफावत आहे.यामध्ये काही दुकानास हजारांच्या संख्येत कार्ड आहेत तर काही दुकानात अत्यंत अल्प कार्ड आहेत . अनेक कार्डधारकांना लांबच्या अंतरावरुन धान्यासाठी ये-जा करावी लागते.त्यामुळे ठरावीक दुकानातच मोठी गर्दी होते . गर्दीमुळे कार्डधारकांना नेहमीच तासनतास रांगेत उभे रहावे लागते. मात्र या परिस्थितीत कोरोना व्हायरसचा समुह संसर्ग वाढु न देता रोखायचा असेल तर जिल्हाधिकारी यांनी सर्व दुकानांना समान कार्डसंख्या करून ज्या त्या परिसरातील रेशनकार्ड धारकांना त्याच परिसरातील रेशनधान्य दुकानांतून धान्य वाटप करण्याची सोय सुलभ करावी . अशी मागणी होत आहे.