मारहाण केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा

इचलकरंजी : येथील डेक्कन मिलसमोर एका ज्वेलर्स दुकानात सहा वर्षांपूर्वी दुरूस्तीला दिलेले चांदीचे पैंजण मागत गैरसमजुतीतून दुकान मालक आणि त्यांच्या भावास शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी सातजणांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला. याबाबत शहाजी खोत यांनी तक्रार दिली. शहीदा मोमीन, वहिदा किस्मतगार, शब्बी किस्मतगार, शहीदा यांचे पती आणि अन्य तीन अनोळखी साथीदार (सर्व रा. फकीर मळा, जवाहरनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मंगळवारी (दि.२६) रात्री वरील संशयितांनी खोत मांच्या ज्वेलर्स दुकानात येऊन सन २०१८ साली दुरूस्तीला दिलेले पैंजण भरत मागितले. त्यावर दुकानदार खोत यांनी त्यासाठी दिलेली चिठ्ठी मागितली, चिठ्ठीसाठी पैंजण देत नसल्याच्या गैरसमजुतीतून संशयितांनी शहाजी आणि त्यांचा भाऊ विक्रमसिंह या दोघांना मारहाण केली. तसेच दुकानाच्या काचा फोडून नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

error: Content is protected !!