चंदुरमध्ये कोरोना बाधीत नऊ ;पंचक्रोशीत खळबळ

चंदूर /ता: २७- पुजा पाटील

            हातकणंगले तालुक्यातील चंदूर शाहूनगर येथील ९ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली आहे. शाहूनगर गल्ली नं 9 मधील एकाच कुटुंबातील 5 जणाचा समावेश आहे.तर अन्य ठिकाणच्या चौघांचा कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये शाहूनगर गल्ली क्र. 9 मधील 75 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 12वर्षीय मुलगा, 9 वर्षीय मुलगी तर शाहूनगर येथील अन्य भागातील 32 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. कुटुंबातील व संपर्कातील 15 जणांचे स्वॅब देण्यात आले होते.

        त्यातील अद्याप सहा जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. संसर्गित झालेल्या रुग्णांना कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागली होती. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या या अहवालांकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, एकाच दिवशी इतके रुग्ण आढळून आले असल्याने स्थानिक प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. शाहूनगर भाग कंटेंनमेंट म्हणून बीडीओ यांनी घोषित केला असून सरपंच संजय घोरपडे यांनी भागातील कारखाने बंद ठेवण्याचे अहवान केले आहे.

error: Content is protected !!