माणगावचा चालता-बोलता इतिहास हरपला

माणगांव (ता . हातकणंगले )

        माणगांव (ता . हातकणंगले ) गावच्या ग्रामपंचायतीमधील सेवेकरी भुपाल बाबू परीट- मामा म्हणजे गावचा चालता बोलता इतिहास . अखंड 51 वर्षे त्यांनी ग्रामपंचातीच्या माध्यमातुन जनतेची सेवा केली .भुपालमामा म्हणजे गावातील प्रत्येकाच्या घरातील व्यक्ती . प्रामाणिकपणा आणि लहानापासुन -थोरांपर्यंत सर्वांचा मानसन्मान राखणे . ते आद्यकर्तव्य समजणारे व्यक्तीमत्व.1969 साली माणगांव ग्रामपंचायतीमध्ये भूपालमामा शिपाई म्हणून नोकरीला लागले.

         51 वर्षात त्यांनी अनेक राजकीय पक्षाचे गटातटाचे टोकाचे राजकारण जवळुन पाहिले . अनेक सरपंच आणि कित्येक सदस्यासोबत भूपालमामांनी काम केले . मामा म्हणजे गावाची खडान् खडा माहिती असणारा गृहपाठ , गाव नकाशा,गट नंबर, घर नंबर, घरात किती व्यक्ती आहेत,50 वर्षापासूनच्या सर्व नोंदी दप्तर कोठे आहेत. याची इत्यंभूत माहिती तोंडपाठ असणारा , कोणतेही काम सांगितले की ताबडतोब काम पूर्ण करून परत फोन करून सांगणारा हुकमी एक्का .

           हेच भूपाल मामा आठ ते दहा दिवसापासुन आजारी होते . त्यांना ताप ,थंडी , सर्दी खोकला होता . दमा पण होता . गावातील खाजगी डॉक्टरांच्या कडे उपचार सुरू होते . पण उपचार करून सुधारणा होत नसलेने त्यांना डॉक्टरनी सांगितले की , तुमची कोरोना टेस्ट करावी लागेल . त्यानुसार माणगावचे समाजसेवक राजु मगदुम यांनी स्वःता कॉल करून घोडावत कोवीड सेंटरमधील डॉ . उत्तम मदने व सुलतान मोकाशी यांना सांगून भुपालमामा व त्यांच्या कुटुंबीयांना स्वॅब तपासणीसाठी पाठवून दिले . त्यांचा अहवाल संध्याकाळी येणार होता . मात्र अचानक सकाळी त्यांचा नातू संकेत याने राजु मगदुम यांना फोन केला . दादा बाबांना खूप कसंतरी होत आहे अस्वस्थ आहेत . श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे . तात्काळ राजु मगदुम यांनी लागलीच स्वतः सुलतान मोकाशी यांना फोन करून सांगितलं की भुपाल मामांना परत मी तिकडे पाठवत आहे . ऑक्सिजनची सोय करा . त्यांना त्रास होत आहे . ॲम्बुलन्स घेऊन जाणारे अमित बिरनाळे यांनाही सांगितलं भूपालमामा यांना घेऊन जायच आहे . तू लगेच ये .हे संपूर्ण करत असताना दहा मिनिट झाल्यानंतर लगेच काही मिनिटात परत संकेतचा फोन आला . दादा बाप्पा सर्वांना सोडून गेले . आणि हे ऐकून राजु मगदुम सुन्न झाले . ते लागलीच त्यांच्या घरी गेले . ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली . अन् गावातील प्रत्येकाला स्वःताचे काळीज कापल्यासारखे झाले . घरातील दोन्ही मुलांना व भुपालमामा यांना पीपीए कीट दिले . मात्र गावची ५१ वर्ष सेवा केलेल्या मामाचे प्रेत उचलण्यासाठी भाऊबंदपैकी कोणीही पुढे येईना .शेवटी वाट बघुन मग शेवटी राजु मगदुम ,अमोल मगदूम , गुंडू हेरवाडे , राहुल पाटील , बाहुबली चौगुले मनोज परीट , संकेत परीट या सर्वांनी ठरवलं आणि पीपीए किट घालून मामांना स्टेचर मध्ये घालून दहन करण्यासाठी ट्रॉली मधून स्मशानभूमीकडे घेऊन गेले . त्यावेळी त्यांच्यासोबत उपसरपंच राजू गडदले , राजू जगदाळे ,अख्तर भालदार अभिजित घोरपडे , बबन परीट प्रमोद पाटील , राजू पठाण प्रशांत तांदळे ही स्वतःहून आलेली मोजकेच मगदुम यांचे सहकारी पण खरंच हा माणूस आपल्या गावची सेवा केला आणि आपल्यातून निघून गेला . आता त्याची शेवटची सेवा आपण करुया या भावनेतुन सगळेच हात सरसावले . मनात मदत करण्याची भावना होती . तितकीच उपस्थित प्रत्येकांच्या ह्रदयात प्रचंड दुःखाच्या वेदनाही होत्या . पण गावची सेवा केलेल्या मामाला दहन देण्याचे भाग्य मात्र ठराविक मोजक्या सेवाभावी व्यक्तीनाच मिळाले . अशा या थोर सेवेकरी मामांना सर्वांनी श्रद्धांजली वाहुन त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी माता वैष्णो देवी चरणी प्रार्थना केली . पण कोरोणा आजारामुळे कुठेतरी माणुसकी संपत आहे . हे मात्र हळूहळू सिद्ध होत आहे . आता गावातील प्रत्येकाला तो इतिहास पाहिला उरल्या त्या आठवणी असेच म्हणावे लागेल .

error: Content is protected !!