रायगड वाॅरयर्स संघाला अजिंक्यपद


 मॉर्निंग स्पोर्ट्स हॉकी क्लब लाईन बाजार आयोजित अंडर-१४ फाईव्ह साईड हॉकी लीग स्पर्धा २०२३ स्पर्धेत रायगड वाॅरयर्स संघाला अजिंक्यपद मिळाले. या स्पर्धेत रायगड वाॅरयर्स संघाने पन्हाळा पँथर्स संघाला अंतिम सामन्यात ५ विरुद्ध ३ गोल फरकाने नमवून पटकावले. रायगड वाॅरयर्स संघाकडून आर्यन भोसले,साई पवार प्रत्येकी दोन गोल व रेहान मुल्लाला एक गोल करण्यात यश मिळाले. तर पन्हाळा पँथर्स संघाकडून अलतमस मुल्ला यास तीन गोल करून पण संघाला विजेतेपद पटकावून देण्यात अपयश आले.

विजेत्या संघाला प्रशिक्षक राजवर्धन तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सागर यवलुजे, ताहीर शेख,संदिप जाधव(सर),अमित संकपाळ,संदीप शिंदे,धनाजी तोरस्कर, उत्कर्ष आळवेकर, राजवर्धन तोडकर,मंगेश खोत, रविराज जगताप, नाझील शेख,गोपी शेख यांच्यावतीने विजेते व उपविजेते पद पटकावलेल्या संघाना पारितोषिक देवून गौरविण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात रायगड वाॅरयर्स संघाने  पुरंदर स्ट्रायकर्स संघावर एकतर्फी ६ विरुद्ध २ गोलने विजय मिळवत अंतिम फेरीत दाखल झाला. रायगड वाॅरयर्स संघाकडून साई पवारने व्यक्तीक ३ गोल, रेहान मुल्लाने २ गोल तर ऋतुराज पाटीलने १ गोल केला. पुरंदर स्ट्रायकर्स संघाकडून अनस पठाण व श्लोक सावंतला प्रत्येकी एक गोल नोंदवता आले. दुसर्‍या उपांत्य सामन्यात पन्हाळा पँथर्स संघाने सिंहगड लायन्स संघावर ५ विरुद्ध  २ गोलने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. पन्हाळा पँथर्स संघाकडून पार्थ चव्हाण व अनुग्रह चोपडेने प्रत्येकी २ गोल तर अलतमस मुल्लाला १ गोल करण्यात यश आले. सिंहगड लायन्स संघाकडून फक्त श्रेयश मलाईला २ गोल करण्यात यश मिळाले. स्पर्धेसाठी पंच म्हणून दीपक पाटील,राहुल गावडे,कपिल मोरे,अभिजीत पाटील, किरण यादव यांनी काम पाहिले. स्पर्धेचे संमोलोचन विजय जाधव यांनी केले. स्पर्धेसाठी अदित्य भोसले,शुभम जाधव,ओंकार डोंगरे,इरफान सय्यद यांनी परिश्रम घेतले.


इतर व्यक्तीक पारितोषिके:-
स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक-आलतमस मुल्ला (पन्हाळा पँथर्स)
बेस्ट डिफेन्स- रेहान मुल्ला(सिंहगड लायन्स)
बेस्ट हाफ- आर्यन भोसले(रायगड वाॅरयर्स)
बेस्ट फॉरवर्ड-ऋतुराज पाटील(रायगड वाॅरयर्स)सर्वाधिक गोल-श्रेयश मलाई (सिंहगड लायन्स)
पहिल्या उपांत्य सामन्यातील सामनावीर-अनस पठाण(पुरंदर स्ट्रायकर्स)
दुसरा उपांत्य सामन्यातील सामनावीर- अदनान संधी (सिंहगड लायन्स)
अंतिम सामन्यातील सामनावीर-ऋग्वेद खंडाळे(रायगड वाॅरयर्स)
उत्तेजनार्थ-श्रेयश यादव(प्रतापगड टायगर्स),दिया मोहिते(पुरंदर स्ट्रायकर्स),तौसिफ म्हालदार(सिंहगड लायन्स)
मालिकावीर- साई पवार (रायगड वाॅरयर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!