आदर्श विद्यानिकेतन संघाला अजिंक्यपद

मिणचे ता हातकणंगले येथील आदर्श विद्यानिकेतन संघाने प्रा. कै. शिवाजीराव घोरपडे स्मृती चषक सब-ज्युनिअर शालेय हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे स्पर्धा झाली. डी. सी. नरके विद्यानिकेतन कुडित्रे विरुद्ध अंतिम सामना पूर्ण वेळेत एक गोल बरोबरीत झाला. टायब्रेकरवर आदर्श विद्यानिकेतन संघाने चार विरुद्ध तीन गोल फरकाने विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रा. डॉ. मंजुश्री घोरपडे, विजय सरदार, वैशाली जमेनिस, वंदना पाटील, प्रा. आशोक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवाजी डुब्बल, सागर जाधव, गणेश पोवार, नजीर मुल्ला, गजानन कुन्हाडे, योगेश देशपांडे उपस्थित होते. पंच म्हणून विश्वजित मेंगाणे, प्रणव चौगले, हर्षवर्धन जाधव, आदित्य कुंभार व गौरव दवगुळे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे आयोजन हॉकी प्रशिक्षक गणेश पोवार यांनी केले.

error: Content is protected !!