चंदूरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

चंदुर /ताः १३ प्रतिनिधी,

     हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील शाहूनगर गल्ली नंबर नऊ मधील किरण विलास बडवे( वय -22 ) या युवकाने राहत्या घरी लाकडी आड्यास साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. किरण हा आधुनिक यंत्रमाग कारखान्यात मेंडिंग कामगार म्हणून काम करत होता.कोरोनो पार्श्वभूमीमुळे त्याचे काम बंद होते.त्याने आज साडेचार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याच्या आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे. किरण मनमिळावू असल्याने त्याचा मोठा मित्रवर्ग होता . त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . 

error: Content is protected !!