चंदूरात वाढतोय कोरोनाचा प्रसार

चंदूर /ता : ७

          चंदूर येथे कोरोनाचा प्रसार वाढत असून शुक्रवारी तिघांना कोरोना संसर्ग झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये चंदूर गावभाग येथील ४५ वर्षीय पुरुष तर शाहूनगर येथील २७ व २९ वर्षीय तरुणांचा समावेश आहे.तर शाहूनगर येथील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.बाधित रूग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. अद्याप २५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आज अखेर चंदूरमध्ये एकूण २२ जणांना कोरोना संसर्ग झाला असून १५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.तर एकाचा मृत्यू झाला आहे .

error: Content is protected !!