चंदुर/ताः ६ वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने अधिकार्यानी भेट देऊन दक्षतेच्या सूचना दिल्या. गतवर्षी याच महिन्यात पंचगंगेच्या पुराचे पाणी पात्राबाहेर येऊन गावांमध्ये हाहाकार माजला होता. यावेळी स्थानिक प्रशासनास पुरपरिस्थिति नियंत्रणाखाली आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. त्यामुळे पुन्हा अशी परिस्थिती उद्भवण्यापुर्वी परिस्थितीची पाहणी करून योग्य तयारी करण्यासाठी अधिकार्यानी भेट दिली.

त्यांनी चंदूर ग्रामपंचायतीस सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार प्रदीप उबाळे , गटविकास अधिकारी अरुण जाधव , सभापती महेश पाटील , सरपंच संजय घोरपडे , पोलीस पाटील राहूल वाघमोडे , ग्रामविकास अधिकारी बी.व्ही. कांबळे मंडल आधिकारी एस जी गोन्सलविस , तलाठी सौ. सुषमा धुत्रे उपस्थित होते.