सहारानगरातील युवकाचा प्रामाणिकपणा, महिलेला दिले मंगळसूत्र परत

चंदूर /ता.२-वार्ताहर

  हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील आपल्या आजारी नातेवाईकास भेटण्यास आलेल्या सौ. पूजा फुटाणे (रा.कोळवण) व त्यांचे पती आभार फाटा चंदुर येथील जय मल्हार बेकरीमध्ये खरेदीस गेले होते. याचवेळी सौ. पूजा यांच्या गळ्यातील एक तोळ्यांचे मंगळसूत्र आज दुपारी एकच्या सुमारास गळ्यातुन तुटून बेकरीजवळ पडले. सायंकाळी 5 च्या दरम्यान महिलेच्या पतीने तिच्या गळ्यात मंगळसूत्र नसल्याबाबत विचारणा केली . तेंव्हा ते पडले असल्याचे दोघांच्याही लक्षात आले.

    त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केल्यानंतर पुन्हा येवुन बेकरीत चौकशी केली. त्यावेळी त्यांना बेकरीतील किरण मंगसुळे यांनी ते मंगळसूत्र जुबेर सय्यद नामक सहारा नगर मधील युवकाला सापडल्याचे सांगितले . व जुबेर यांनी मंगळसुत्र सापडल्याची माहिती प्रामाणिकपणे किरण यांना सांगून कोणी शोधत आल्यास आपला नंबर त्यांना द्यावा अशी माहिती दिली होती.
   यानंतर सौ . पुजा व त्यांचे पती यांनी जुबेर यांच्याशी संपर्क साधला . व ओळख पटवून सदर मंगळसूत्र त्यांना जुबेर या युवकाने प्रामाणिकपणे परत केले . जुबेर याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंगळसूत्र परत करताना चंदूरचे माजी सरपंच गणेश मंगसुळे, हजरत नागराळ, संतोष फुटाणे, कपिल मगदूम या सर्वांच्यासमोर त्यांनी परत केले .  

error: Content is protected !!