सोशल मीडियाद्वारे खोटी माहिती प्रसिद्ध करणार्‍यावर कायदेशीर कारवाई करणार – चंदूर ग्रामपंचायत ; घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन कृत्रिम जलकुंडात

चंदूर /ता३०- वार्ताहर

       हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील विसर्जनासाठी दान केलेल्या श्री. गणेश मूर्ती विकत असलेली खोटी माहिती सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करणार्‍यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती चंदूर ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली.तसेच समाजाच्या भावना दुखावतील अशी कोणतीही घटना चंदूर मध्ये घडली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. चंदूर ग्रामस्थांनी गावची बदनामी करणार्‍या दोषीवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन पोलिस उपअधिक्षकांना दिले.
       चंदूर येथे २०११ पासून घरगुती गणेश मुर्तीचे कृत्रिम जलकुंड तयार करून पर्यावरण पूरक विसर्जन करण्यात येते. यावर्षीही कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर गर्दी होवू नये. यासाठी अधिक जलकुंडची व्यवस्था करण्यात आली होती.सायंकाळ पर्यन्त ११५० मुर्ती जमा करण्यात आल्या होत्या. यातील १०६५ श्रीं च्या मुर्ती विधिपुरक विसर्जित करण्यात आल्या.तर त्यातील ८५ मुर्ती शासनाच्या नियमाधीन राहून देण्यात आल्या होत्या.पण या घटनेची सत्यता पडताळून न पाहता काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचा मजकूर प्रसारित करून गावाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा व्यक्तीवर तात्काळ कारवाई न झाल्यास इथून पुढे सर्व गणेश मूर्ती नदीमध्येच विसर्जित करणार असल्याचे ग्रामस्थांच्या कडून सांगण्यात आले. मात्र चंदूरमध्ये समाजाच्या व इतरांच्या भावना दुखावतील असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्थानिक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी बी.व्ही. कांबळे, प. स . सभापती महेश पाटील, मा.सरपंच माणिक पाटील, मारुती जाधव,संजू घोरपडे, रामा पुजारी, सुधीर पुजारी,नंदू कांबळे,पोलिस पाटील राहुल वाघमोडे, लालता पुजारी उपस्थित होते.

error: Content is protected !!