हातकणंगले-इचलकरंजी वाहतूक मार्गात बदल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ८ मार्च रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. कोरोची येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. तारदाळ फाटा येथून येणारी वाहतूक बंद राहणार असून, ती तारदाळ, इचलकरंजीकडे मार्गस्थ करण्यात आली आहे. हातकणंगले येथील इचलकरंजी फाटा येथून व हातकणंगले ठाण्यासमोरून इचलकरंजीकडे जाणारी वाहतूक बंद असून, ती सर्व अतिग्रेमार्गे वळवण्यात आली आहे. तिळवणी, कोरोची मार्गावरील वाहतूक रुई फाटा मार्गे इचलकरंजीकडे मार्गस्थ करण्यात येणार आहे. पंचगंगा कारखाना मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून, ही वाहतूक शहापूर, यड्राव फाटामार्गे मार्गस्थ करण्यात येणार आहे. हातकणंगले येथील इचलकरंजी फाटा ते यड्राव फाटा हा परिसर नो पार्किंग करण्यात आला आहे.

error: Content is protected !!