कबनूर ऊरुसानिमित्त वाहतूक मार्गात बदल

कबनूर

जंदीसो ब्रॉनसाहेब दर्गा उरुस कबनूर ता. हातकणंगले येथे दि. ३ ते ९ एप्रिल २०२४ या कलावधीत साजरा होणार आहे. या उरुसासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक दर्शनास येत असतात हे सर्व भाविक प्रवासी वाहतूक करणाऱ्या विविध वाहनाने कबनूर येथे येणार आहेत. दि. ३ ते ९ एप्रिल या कालावधीत रहदारीचे तसेच पार्किंगचे नियोजन करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कळविले आहे.
वाहतुकीसाठी बंद व चालू केलेले मार्ग या प्रमाणे – कोल्हापूर कडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनासाठी कबनूर ओढा ते शाहू पुतळा आणि शाहू पुतळा ते कबनूर सर्व प्रकारच्या वाहनाना बंदी घालण्यात येत आहे. कोल्हापूर कडून येणारी थांबे घेणारी एसटी बस कबनूर ओढा केटकाळे बोरवेल मार्गे पंचगंगा कारखाना, नवीन नगरपालिका चौक, आंबेडकर पुतळा ते एसटी स्टॅण्ड असे राहील तसेच परत इचलकरंजी एसटी स्टॅण्डहून कोल्हापूरला जाणारी त्याच मार्गाने परत जातील. कोल्हापूर कडून येणारी सर्व अवजड वाहने तसेच विना थांबा कोल्हापूर-इचलकरंजी एसटी बस अतिग्रे फाटा हातकणंगले मार्गे इचलकरंजी कडे येतील तसेच इचलकरंजीहून कोल्हापूर कडे जाणारी अवजड वाहने शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, नवीन नगरपालिका चौक, पंचगंगा कारखाना, कोरोची हातकणंगले मार्गाने कोल्हापूरला जातील. कोल्हापूर हुन इचलकरंजीकडे येणारी हलकी वाहने कबनूर ओढा केटकाळे बोरवेल मार्गे पंचगंगा कारखाना, नवीन नगरपालिका चौक असे येतील. नदीवेश नाका इचलकरंजी कडून कोल्हापूर कडे जाणारी हलकी वाहने उत्तर प्रकाश टॉकीज संभाजी चौक, शाहू पुतळा, नवीन नगरपालिका चौक, पंचगंगा कारखाना, कबनूर ओढा मार्गे कोल्हापूर ला जातील. इचलकरंजीहून चंदूरकडे जाणारी एसटी बस व इतर वाहने शाहूपुतळा तीनबत्ती चौक, सुर्वे नगर, शाहूनगर, चंदूरला जातील व त्याच मार्गाने परत येतील.

error: Content is protected !!