वडगाव /ता : ३०
राजर्षि शाहु शिक्षण प्रसारक मंडळ चावरे संचलित चावरे माध्यमिक विद्यालयाचा इ.10 वी चा सेमी इंग्रजी माध्यमाचा सलग दुसऱ्या वर्षी 100% तर मराठी माध्यमाचा 99% निकाल लागला. विद्यालयाचे गुणानुक्रमे विद्यार्थी
पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक कु. वैष्णवी शेखर पाटील (95.60%),द्वितीय क्रमांक कु. वेदिका लहु माने(94%),
तृतीय क्रमांक- कु. विद्या रामचंद्र सुतार(91.40%)
एकुण विद्यार्थ्यांपैकी डिस्टिंक्शन मध्ये 22 विद्यार्थी , प्रथम श्रेणीमध्ये 15 विद्यार्थी , द्वितीय श्रेणीमध्ये 06 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस. बोराडे , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच संस्थापक अध्यक्ष श्री.बी.जी. बोराडे सर यांचे प्रोत्साहन मिळाले. सर्व विद्यार्थ्यांचे व शाळेचे पंचक्रोशीतून पालकांकडून कौतुक होत आहे .



