हातकणंगले-इचलकरंजी मार्गावर तपासणी नाके कार्यरत

हातकणंगले

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हातकणंगले, इचलकरंजी मार्गावर निवडणूक विभागाने तपासणी नाके सुरु . केले आहेत. हातकणंगले येथील बसस्थानकासमोर व पंचगंगा कारखाना चौकात मंडप उभारण्यात आले आहेत. याठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांसह निवडणुक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून संशयित वाहनांची तपासणी करुन झडती घेतली जात आहे. निवडणुकीच्या काळात बेकायदेशीर आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते. रोखड, देवाणघेवाण करण्यासाठी वाहनांचा वापर केला जातो. त्यामुळे अशा तपासणी नाक्याच्या माध्यमातून पायबंद लावला जात आहे.

error: Content is protected !!