छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न

    जुना बुधवार पेठ(कोल्हापूर) येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल व जुनिअर कॉलेज कोल्हापूर येथे भारतीय ७६ वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक श्री जे आर जोशी यांनी ध्वजारोहण केले व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


    विद्यालयातील वाद्यवृंदच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच प्राथमिक विभागाच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली शौर्य नाळे, आर्यन कांबळे या बालचमुनी देशभक्तीपर गीते साद केली. यावेळी मान्यवरांच्याहस्ते देणगीदारांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले तसेच इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचेही सत्कार करण्यात आले.

     याप्रसंगी संस्थेचे आजीवसेवक श्री राम साळुंखे, माजी मुख्याध्यापक अजित मोहिते, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका  उज्वला जाधव, राहुल शेवाळे, श्रीमती जुगार, विशाल यादव, राम कणसे, संगीत शिक्षक  महेश हिरेमठ, एस टी पाटील विद्यालयाचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर सेवक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमित कांबळे यांनी केले.
error: Content is protected !!