मुख्यमंत्र्यांनी घेतले आळते येथील श्री क्षेत्र रामलिंगाचे दर्शन

आळते ता हातकणंगले श्री क्षेत्र रामलिंग येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाशिवरात्रीनिमित्त दुग्धाभिषेक करून दर्शन घेतले. या क्षेत्रास भेट देणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले. यावेळी उपस्थितांनी ‘जय श्रीराम’, ‘जय शिव शंभो’…. या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र रामलिंग येथील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती. त्यातच अचानक मुख्यमंत्र्यांच्या

गाड्यांचा ताफा आला. मात्र भाविकांना नेमके कोण आले याचा अंदाज आला नाही. तेवढ्यातच मुख्यमंत्री शिंदे गाडीतून उतरल्याने भाविकांनाहीआश्चर्याचा धक्का बसला. मुख्यमंत्र्यांनीही शिवलिंगाचे दर्शन घेऊन.दुग्धाभिषेक केला. त्यानंतर ते पेठवडगावला मार्गस्थ झाले. यावेळी खा. धैर्यशील माने, राजेश क्षीरसागर, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे, रवींद्र माने, आदी उपस्थित होते. जि.प. माजी सदस्य अरुण इंगवले यांनी स्वागत केले.

error: Content is protected !!