गोबरगॅस मध्ये पडून बालकाचा मृत्यु

MSK Digital news :

खडकेवाडा ता. कागल येथील पृथ्वीराज प्रशांत कोराणे
व.व.3 या बालकाचा घरामागे खेळत असताना गोबरगॅसच्या उकिरड्यात पडून दुर्देवी मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूच्या बातमीमुळे ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.या घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे.
गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास पृथ्वीराज घरामागे  खेळत होता.नजरचुकीने तो जवळच असणाऱ्या गोबरगॅस मधून निघणाऱ्या शेणखतासाठीच्या खड्यात पडला. तो दिसेनासा झाल्यामुळे घरातील व्यक्तींनी लगेच त्याचा शोध घेतला पण त्यावेळी खड्यातून बुडबुडे बाहेर येत असल्याचे दृष्टीस पडले.
काही व्यक्तींनी काठीच्या साहाय्याने शोध घेतला.या वेळी हा बालक निदर्शनास आला. त्याला लगेच उपचारासाठी निपाणी आणि तेथून कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र त्याला अखेर मृत्यूने गाठलेच.
त्याच्या पश्चात पणजोबा,आजोबा,आजी,आई,वडील असा परिवार आहे.

त्याच्या पश्चात पणजोबा,आजोबा,आजी,आई,वडील असा परिवार आहे

error: Content is protected !!