…अन्यथा मंत्र्याना राज्यात फिरू देणार नाही : चित्रा वाघ

सोलापूर / ताः ३-प्रमोद गोसावी

         शेतकर्‍यांविषयी बघ्याची भूमिका घेणार्‍या नाकर्त्या राज्य सरकार कडून दूधाच्या बाबतीत राजकारण होत असल्याचा आरोप करीत बळीराजाला न्याय मिळालाच पाहिजे. अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही. असा इशारा भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिला .
    अक्कलकोट येथे सोलापूर रस्त्यावर विद्युत वितरण आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप व मित्र पक्ष यांच्या वतीने दूध उत्पादकांच्या राज्यव्यापी महाएल्गार आंदोलना प्रसंगी बोलत होत्या. यावेळी खास. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, प्रदेश कार्यकरणी सदस्य शहाजी पवार, तालुका अध्यक्ष मोतिराम राठोड, महिला अध्यक्षा सुरेखा होळीकट्टी, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, कृषी तज्ञ आप्पासाहेब पाटील, आर.पी.आय .तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, रासपचे दत्ता माढेकर, सुरेश गुत्तेदार, न.प. उपाध्यक्ष यशवंत धोगडे, पक्षनेते महेश हिंडोळे, राहूल रूही, चंद्रकांत इंगळे, मल्लिनाथ स्वामी, राजशेखर मसुती, मधुकर सुरवसे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रदिप पाटील, परमेश्वर यादवाड, नगरसेवक कांतू धानशेट्टी, मिलन कल्याणशेट्टी, सिध्दाराम टाके, दयानंद बिडवे, दयानंद उंबरजे, सागर कल्याणशेट्टी, बाळा शिंदे, पंचायत समिती सदस्य गुंडाप्पा पोमाजी, ऋषी लोणारी, बसवंतराव कलशेट्टी, जेष्ठ समाजसेवक दिपक जरिपटके, माझी नगरसेवक सुनिल गंवडी, दयानंद बंमनळ्ळी, बालाजी पाटील, धनजंय गाडवे, प्रथमेश जोजन, नागनाथ कुंभार आदीजन बहु संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
    पुढे बोलताना चित्रा वाघ यांनी राज्यातील तिघाडी सरकारवर सडकून टिका केली. शेतकरी विरोधी सरकार असल्याचे सांगून जगाचा पोशिंदा असणार्‍या शेतकर्‍याला वार्‍यावर सोडून देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. शेतकर्‍याच्या दुधाला भाव मिळालाच पाहिजे. सध्या जग कोरोना सारख्या महामारीने त्रस्त आहे. महाराष्ट्रात रुग्णांचे प्रमाण वाढत आहेत. अशा वेळी जनतेला म्हणाव तशा सोयीसुविधा मिळत नसल्याचा आरोप करीत शेतकरीवर्गावर देखील त्यांच्या धोरणामुळे घोर अन्याय होत असल्याचे सांगून, न्याय न मिळाल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वाघ यांनी यावेळी दिला.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरण असल्याचे सांगून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना कसा न्याय दिला याचे विवेचन केले . मात्र ह्या सरकारकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला महत्व आहे. असे असताना शेतकरी विरोधी राज्य सरकारकडून अन्याय केला जात आहे. अशी परखड टिका आ. कल्याणशेट्टी यांनी केली.
       भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी शेतकरी विरोधी सरकार राज्यात कार्यरत असून, या सरकारकडून शेतकर्‍याचा बळी घेतला जात आहे. आज दुधाचा प्रश्न, खते, बि-बियाणे खरेदीकरिता रांगा व बोगसचे वाढते प्रमाण शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसत असल्याचे सांगून, शेतकरी विरोधी धोरणाबाबत राज्य सरकारवर देशमुख यांनी टिका केली. प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार म्हणाले राज्यातील सरकारकडून शेतकर्‍यांची विविध माध्यमातून आडवणूक केली जात आहे. दूध व्यवसाय हा शेतकर्‍यांना दोन पैसे मिळवून देणारा आहे. मात्र याबाबत राज्य सरकारची उदासिनतेची भूमिका असल्याने शेतकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले . याप्रसंगी विविध मागण्याचे निवेदन नायब तहसिलदार बालाजी बनसोडे यांना देण्यात आले. 

error: Content is protected !!