हातकणंगले /ताः ६
चोकाक (ता . हातकणंगले ) उपसरपंच पदी महावीर सुकुमार पाटील यांची बिनविरोध निवड झाली . सरपंच सौ . मनीषा सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली . नुतन उपसरपंच पाटील यांच्यासाठी सौ सुवर्णा प्रकाश सुतार यांनी अनुमोदन दिले .
यावेळी ग्रामपंचयत सदस्य योगेश चोकाककर ,मनीषा कुंभार, अर्चना हलसवडे, विजय नानावरे,विकास चव्हाण पोलीस पाटील सचिन कुंभार , ग्रामसेवक सौ.अनुपमा सिदनाळे यांच्या उपस्थितीत निवड झाली . मावळते उपसरपंच सुकुमार पाटील यांना शुभेच्छा दिल्या .