रंग लावण्यावरुन हुपरीत दोन गटात हाणामारी

हुपरी

रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांच्याकडे बघणे व एकमेकांना रंग लावण्याच्या कारणावरून हुपरी कागलवेश परिसरात तरुणांच्या दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे सात जण जखमी झाले आहेत. हाणामारीत लोखंडी रॉड, बांबूच्या काठ्या, दगड याचा वापर केला आहे. हाणामारी झाल्याप्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात २१ जणांवर परस्पर गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
याबाबत हुपरी पोलिसातून समजलेली माहिती अशी की, रंगपंचमीच्या दिवशी कागलवेश व विठ्ठल चौक हुपरी येथील तरुण रंगपंचमी खेळत असताना एकमेकांकडे बघणे व रंग लावण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून जोरदारपणे एकमेकांच्यात हाणामारी होऊन’ दगड फेकून मारण्याचा प्रकार घडला त्यात दोन्ही बाजूचे सात जण जखमी झाले. गौरव सुनील नेमिस्ट (वय २७ रा. विठ्ठल चौक हुपरी) यांच्या फिर्यादीवरुन मच्छिंद्र मुधाळे, निकेत गायकवाड, निशांत गायकवाड, ओंकार शेटके, प्रसाद निंबाळकर, संतोष मुधाळे, युवराज घोरपडे, उदय मुधाळे, आदित्य माने, सौरभ गायकवाड, शहाजान घुडू‌भाई, तेजस उलपे सर्व रा. हुपरी यांच्या विरोधात हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. निशांत नीलकंठ गायकवाड (वय ३१, रा. कागलवेश यांच्या फिर्यादीवरुन सतीश मुधाळे, महेश मुधाळे, रोहित सव्वाशे, व्यंकटेश म्हेतर, गौरव नेमिस्ट, सौरभ बेले, शैलेश म्हेत्तर, निखिल बेले, आशिष माने सर्व राहणार हुपरी यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. झालेल्या हाणामारी मध्ये लोखंडी रॉड, काठ्या, दगड याचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने गौरव नेमिस्ट, सतीश मुधाळे, सौरभ बेले, रोहित सव्वाशे, निशांत गायकवाड, मच्छिंद्र मुधाळे, युवराज घोरपडे हे जखमी झाली आहेत. परस्पर एकमेकांच्यावर हुपरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद झाली असून पोलीस ताब्यात घेण्यासाठी शोध घेत आहेत.

error: Content is protected !!