सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का?  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विरोधकांना टोला

    गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना दरवेळी पानटपरीवाला म्हणून हिणवण्यात येते. कुणाला हिणवणे चुकीचे आहे. कुणीही शून्यातून येऊन नवनिर्मिती करत असतो. मी शेतकऱ्याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झाला, पण हे विरोधकांना चालत नाही. मात्र जनेतेने आम्हाला स्वीकारल आहे. हे तुम्ही ध्यानात ठेवा. सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा सवाल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde)  यांनी आज जळगावात (Jalgaon) राष्ट्रवादीसह उद्धव ठाकरेंवर (Udhhav Thackeray) सडकून टीका केली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर असून आज मुक्ताईनगर येथे जाहीर सभा झाली. यासभेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी पक्षावर प्रहार केला. यातच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. मुक्ताईनगर शहरातील क्रीडा संकुलाच्या मैदानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. यावेळी ते म्हणाले कि, शिवसेनेत असताना आम्ही उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी पक्ष संपवीत आहे, हे वारंवार सांगत होतो. त्यावेळी गुलाबराव पाटील देखील म्हणत होते, त्यांना सांगा राष्ट्रवादी आपल्याला संपवीत आहे. मी स्वतः त्यांना पाच वेळा सांगितले, कि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेलो ती चूक सुधारवा पण ऐकले नाही.

ते पुढे म्हणाले, कि आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि मोदीचा फोटो लावला आणि निवडणूक जिंकलो. शिवसेनेतून बाहेर पडत आम्ही बरोबर केले. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार? आम्ही चूक सुधरवली मग गद्दार कोण? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला. आमदार खासदार यांची काम होत नव्हती, आता ती दोन महिन्यात केली. विरोधी पक्ष आता घाबरला असून एकनाथ शिंदे गणपती मंडळ फिरतो, घराघरात जातो. त्यामुळे ते फिरत आहेत. आता त्यांनी अर्धे पुण्य मला द्यायला हवे. तर काहीजण दोन मुख्यमंत्री ठेवण्याचे सांगतात.मात्र त्यांना आधीचा अनुभव असल्याने ते असे म्हणत असल्याचा खोचक टोलाही मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना लगावला.

error: Content is protected !!