मुंबई / प्रतिनिधी
राज्यात करोनाचा (Corona) उद्रेक झाला असून कोरोनाच्या स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल टास्क फोससोबत (Task Force) बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. राज्यातील संसर्गाची साखळी तोडणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी लॉकडाऊन (lockdown) हा एकमेव पर्याय असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या राज्याच्या टास्क फोर्सच्या या बैठकीत लॉकडाऊन विषयी संखोल चर्चा करण्यात आली. टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी लॉकडाऊन लागू करावे असे मत मांडले आहे. राज्यात करोना संसर्गाची स्थिती पाहता सध्या लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टास्कफोर्समधील बहुतेक सदस्यांचे मत आहे. काही सदस्यांचे वेगळेही मत आहे. मात्र बहुतेक तज्ज्ञांचे मत हे मत हे लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
तर लॉकडाउनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी बैठकीनंतर महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या १४ एप्रिल या दिवशी मंत्रिमंडळ बैठकीनंतर लॉकडाऊन संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.