कमर्शियल सिलिंडर ३२ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी सोमवारपासून व्यावसायिक गॅसच्या दरात कपात केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि वायू विपणन कंपन्यांनी १ एप्रिलपासून १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅसचा दर प्रतिसिलिंडर ३२ रुपयांनी स्वस्त केला. व्यावसायिक गॅसच्या किमतीत कपात केल्यानंतर दिल्लीमध्ये त्याची किंमत ३०.५० रुपयांनी कमी होऊन १,७६४.५० रुपये झाली आहे. यापूर्वी हा दर १,७९५ रुपये होता. तर मुंबईत ३१.५० रुपयांच्या कपातीमुळे १,७४९ रुपयांऐवजी आता केवळ १,७१७.५० रुपये मोजावे लागतील.

error: Content is protected !!