महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार निवडीसाठी कमिटी जाहीर

बेळगाव

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार उभा करण्याचे निश्चित झाले असून उमेदवार निवडीसाठी ३२ जणांची कमिटी जाहीर करण्यात
आली आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चुरशीची लढत होणार असे प्रथम दर्शनी दिसत असले तरी यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे. त्यामुळेच तगडा उमेदवार उभा निवडण्यासाठी ३२ जणांची कमिटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय शुक्रवारच्या बैठकीत घेण्यात आला.

error: Content is protected !!