सरनोबतवाडी (दिनांक 26 ऑगस्ट ): शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर,शिक्षणशास्त्र अधिविभागातील बी. एड.-एम. एड. (एकात्मिक ) वर्ष -3, सत्र 6 मधील विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत सरनोबतवाडी येथे समुदाय गुंतवणूक कार्यक्रम शनिवार दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित केला होता. समुदाय गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत या विद्यार्थ्यांनी गावाचे सर्वेक्षण व गावाकऱ्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना हव्या असणाऱ्या बाबींची नोंद घेतली. गावकऱ्याकडून मिळालेल्या माहितीवर सरपंच सौ. शुभांगी अडसूळ, उपसरपंच, ग्रामपंचायत सभासद आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली.

चर्चेतून विद्यार्थ्यांनी कुमारिका मुलींना मासिक पाळीविषयी मार्गदर्शन, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पावसाळ्यात घ्यावयाची आरोग्याची काळजी व माहिती संप्रेषण युगामध्ये पालकांनी आपल्या पाल्याविषयीं घ्यावयाची काळजी या विषयावर गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे निश्चित केले. सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत नाटिका, मार्गदर्शन आणि समुपदेशन, पथनाट्य, घरोघरी भेटी, गावफेरी, विविध घोषणा व प्रात्यक्षिक असे कार्यक्रम सादर केले. गावाने यास उत्तम प्रतिसाद दिला तसेच असे कार्यक्रम वरचेवर व्हावेत असेही सांगितले.

प्रात्यक्षिक प्रमुख डॉ. नगिना माळी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमासाठी अधिविभागप्रमुख प्रा. डॉ. प्रतिभा पाटणकर आणि त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले
