देशात व राज्यात पुन्हा भाजपला निवडून देवून या पापाचे धनी व्हायचे नसेल आणि विकासाचे दर्शन हवे असेल तर जनतेने आता परिवर्तनाची शपथ घ्यावी’, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी केले. सतेज पाटील म्हणाले, ‘भाजपमुळे देशाचे वातावरण दुषित झाले आहे, त्यात आता राज्यात त्या पलिकडचे वातावरण आहे. शंभर टक्के निवडून येण्याची खात्री नसल्याने विविध पक्षांमध्ये भाजप फोडाफोडी करीत आहे.

आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील जनसंवाद पदयात्रेची सुरुवात गडहिंग्लज तालुक्यातील चनाळमधून झाली. इंचनाळ, हरळी बुद्रुक, हुनगिनहाळनंतर भडगाव येथे पहिल्या टप्प्याची सांगता झाली. या सांगता सभेत ते बोलत होते. दरम्यान, फुलांच्या वर्षावात व वाद्यांच्या गजरात पदयात्रेचे स्वागत करण्यात आले.
ते म्हणाले, ‘भाजपमुळे देशातील वातावरण बिघडले आहे. महात्मा गांधी, पंडीत नेहरु यांच्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवून इतिहास पुसण्याचे काम भाजप करीत आहे. पीएम किसानमधून सहा हजार रुपयांवर शेतकऱ्यांच्या उड्या पडत असल्या तरी महागाईच्या माध्यमातून तुमच्याच खिशातून भाजप पुन्हा ५० हजार काढून घेत आहे. यामुळे जनतेने आता जागे झाले पाहिजे. भाजपच्या या चुकीच्या कारभाराचे प्रबोधन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी. काँग्रेसने ७५ वर्षात सामान्यांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिल्याने विश्वासाचा पक्ष म्हणून जनता काँग्रेसकडे पाहते.’
याप्रसंगी अॅड. दिग्विजय कुराडे, विद्याधर गुरबे, अंजना रेडेकर, संग्रामसिंह नलवडे, बाजीराव खाडे, सोमगोंडा आरबोळे, राजू खमलेट्टी, रामराज कुपेकर यांची भाषणे झाली. अजित बंदी यांनी स्वागत केले. यावेळी डॉ. आण्णासाहेब चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष प्रशांत देसाई, शहराध्यक्ष बसवराज आजरी, अजिंक्य चव्हाण, प्रा. किसनराव कुराडे, अमर चव्हाण, शिवप्रसाद तेली, सरपंच वंदना शेंडुरे, मलाप्पा भोई, वसंत नाईक, दयानंद पट्टणकुडी आदी उपस्थित होते.
