बहिरेवाडीत कोरोनाचा फैलाव तरीही नागरिक रस्त्यावरच ; सोशल डिस्टंनसिगचा उडाला फज्जा

वारणानगर /ताः १-प्रतिनिधी

         बहिरेवाडी (ता.पन्हाळा) येथे आज आणखी दोन महिलांचे पाँझिटिव्ह अहवाल आले असून एका आठवड्यात एका बळीबरोबरच त्यांच्या कुटुंबातील एकुण सहा जणांना कोरोणाची लागण झाली आहे.आता यापुढे सामुहिक संसर्गाची भिती असल्याने कोणीही कारणाशिवाय घराबाहेर पडू नये.गरम पाण्याची वाफ घ्यावी . आयुर्वेदिक काढा प्यावा . तोंडाला मास्क लावावे .हाताची स्वच्छता करावी . सँनिटायझरचा वापर करावा .यासारख्या उपाययोजना करून कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सर्वानी सामुहिक प्रयत्न करून सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच शिरीषकुमार जाधव यांनी केले आहे.

                         होमिओपॅथी औषधाचे वाटप करताना मान्यवर व नागरीक

        सध्या गावात आमदार डॉ विनय कोरे यांचेमार्फत अर्सेनिकम अल्बम हे होमिओपॅथी औषध पुरविले आहे. त्याचा वापर सुरु आहे. तसेच सांस्कृतिक कला क्रीडा तरुण मंडळाचे वतीने मास्क आणि सँनिटायझरचे घरोघरी वाटप करून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकस आहार, व्यायाम, पुरेशी झोप, सामाजिक अंतर राखत कोरोनावर मात करणारी जीवनशैली अंगीकारावी . या आशयाचे समाजप्रबोधन करण्यात येत आहे..
एका आठवड्यात अख्ख्या कुटूंबाला कोरोनाने घेरले असून एका बळीबरोबर आणखी सहा जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. या कुटूंबाच्या संपर्कात गावातील व गावाबाहेरचे अनेक लोक आल्याची चर्चा आहे.किती लोकांना क्वांरनटाईन करायचे हा मोठा प्रश्न झाला आहे. तरीही गावातील बऱ्याच लोकांना याबाबतचे गांभीर्यं दिसत नाही. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने स्वतः वर आचारसंहिता लादून घेतली पाहिजे.कोरोनाचा वाढता फैलाव सुरू असताना जनतेने बाहेर मोकाटपणे फिरणे थांबवावे. असे ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन केले आहे .

error: Content is protected !!