जवाहरच्या कर्मचाऱ्याचा मृत्यु , कोरोनाचा माणगावात शिरकाव ;गाव भीतीच्या सावटाखाली

हातकणंगले /ता : २२

        जवाहर सहकारी साखर कारखान्यातील शेती विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यु झाला . पंचेचाळीस वर्षीय व्यक्ती माणगाव (ता . हातकणंगले ) येथील आहे . या घटनेमुळे माणगाव गावात कोरोना रोगाने प्रथमच प्रवेश केला आहे . मृत्युच्या घटनेने गाव हादरून गेले आहे . माणगावमध्ये अनेक दिवसापासून सॅनिटायझिंग व निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी नियमित सुरू होती . तरीपण गावातील व्यक्तीचा मृत्यू कसा झाला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . तसेच त्याचा संपर्क कोणाशी आला व त्याला संसर्ग कसा झाला आहे . याची माहीती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते .

           मयत कोरोणा बाधीत व्यक्ती ही कारखान्याच्या यळगुड सर्कलमध्ये नोकरीस होती . रविवारी सकाळपासून त्याला ताप व धाप सुरू झाला . त्यामुळे तात्काळ त्याला कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले . पण उपचारा दरम्यान त्याच्यामध्ये काहीच सुधारणा होत नसल्याने त्याची स्वॅब तपासणी केली असता . त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला . व त्याचा रिपोर्ट आल्यानंतर अवघ्या काही तासातच तो मयत झाला पण त्याला हुपरी येथुनच संसर्ग झाल्याची चर्चा हॉस्पीटल परिसरात सुरू होती . रात्री उशिरापर्यंत त्याचे कोल्हापुरातच दफनविधी करण्याची चर्चा माणगावात सुरू होते .

error: Content is protected !!