कोल्हापूर/प्रतिनिधी
संचारबंदी आदेश लागू करूनही जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. मागील चोवीस तासांत तब्बल ४५२ जणांना लागण झाली असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून २२७० जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३१५० झाली आहे.
मागील चोवीस तासांत कोल्हापूर शहरातील १९२, आजरा तालुक्यातील १७, भुदरगड तालुक्यातील १७, चंदगड तालुक्यातील ५, गडहिंग्लज तालुक्यातील ४, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ५७, कागल तालुक्यातील १६, करवीर तालुक्यातील ५०, पन्हाळा तालुक्यातील २०, राधानगरी तालुक्यातील ३, शाहूवाडी तालुक्यातील ४, शिरोळ तालुक्यातील १२, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २३ आणि इतर जिल्ह्यातील ३१ अशा ४५२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
करवीर तालुक्यातील निगवे दुमाला, कोल्हापुरातील शुक्रवार पेठ, यादवनगर, भुदरगड तालुक्यातील कांडगाव, शाहूवाडी तालुक्यातील पंदुरे, कागल तालुक्यातील कसबा सांगाव, आजरा तालुक्यातील पोश्रातवाडी येथील प्रत्येकी १ असे एकूण ७, गडहिंग्लज तालुक्यातील मानवाड व हलकर्णी येथील प्रत्येकी १, कणकवली तालुक्यातील १, सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथील १ आणि बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथील १ असे पाच अशा एकूण १२ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.