पुष्पनगर येथे एकाच कुटुंबातील १२ जण बाधित , तालुक्यात एका दिवसांत १९ रुग्ण ; भुदरगड तालुक्यात एकूण संख्या १३२

गारगोटी / ता :३० (प्रतिनिधी)

        भुदरगड तालुक्यात गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून तालुक्यात आज एकाच दिवशी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर पुष्पनगर गावातील एकाच कुटुंबातील १२ जणांसह १४ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या १३२ वर पोहोचली, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे तालुक्यात भितीचे वातावरण आहे.
    भुदरगड तालुक्यात तालुका वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरसह नऊ अहवाल पॉझिटिव्ह आले होते, त्यात गुरुवारी आणखीन भरच पडली, आज गारगोटी येथे बाजारपेठेतील प्रसिद्ध डॉक्टरसह तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले . खाजगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर कोरोना बाधित आढळलेने बाजारपेठ सील करणेत आली . या डॉक्टरांच्या दवाखान्यात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांचे धाबे दणाणले आहेत . दवाखाना सील करणेत आला . असून आतापर्यंत खाजगी दवाखाने सील करावा लागलेला गारगोटी येथील हा तिसरा दवाखाना आहे. या डॉक्टर शिवाय मडूर येथील बाधिताच्या संपर्कात आलेली गारगोटी कॉलनी परिसरातील ३५ वर्षीय महिला व ६५ वर्षीय पुरुष असे तीनजण कोरोना बाधित आढळले.
        आज पुष्पनगर या तीन हजार लोकवस्तीच्या गावात कोरोनाने कहर केला, या गावातील एकाच कुटूंबातील १२ जणांसह इतर दोन पुरुष असे १४ रुग्ण आढळून आले . या कुटुंबातील एकजण गडहिंग्लज येथील डॉक्टरांच्या संपर्कात आले असलेचे समजते, ही व्यक्ती आणि त्याचे दुसरे दोन भावांचे कुटूंब शेजारी शेजारी घरामध्ये राहतात . त्या कुटूंबाचे एकमेकांचे घरात येणे-जाणे होते . त्यातून या कुटूंबातील सदस्यांना बाधा झाली आहे . त्यामुळे गाव भीतीच्या छायेखाली आहे . गाव पूर्णतः सील करणेत आले आहे.
       तर भुदरगड तालुक्यातील , भेंडवडे गावातील ३८ वर्षीय पुरुष व गंगापूर येथील ४६ वर्षीय पुरुष असे तालुक्यात आज एकूण १९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले . त्यामुळे भुदरगड तालुक्याची एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १३३ वर पोहोचली, दिवसेंदिवस हा आकडा वाढत असलेने तालुक्यातील नागरिकांत सध्या भीती असून लॉकडाऊन नसतानाही रस्त्यावरील गर्दी कमी झालेचे दिसते.

गारगोटी येथे बाजारपेठेतील डॉक्टरांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्यानंतर दवाखान्याच्या परिसर सील करणेत आला.

error: Content is protected !!