शिरोळ तालुक्यात कोरोनाचे थैमान; दिवसात तब्बल 14 नवीन रूग्ण

शिरोळ / ता : २३

              एका दिवसात तब्बल 14 नवीन कोरोना रूग्ण शिरोळ तालुक्यात आढळून आले. यातील एका कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना संकट शिरोळ तालुक्यात अधिक गंभीर होत असलेने तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे .तालुक्यातील जयसिंगपूर शहरात एका डॉक्टरासह कोरोना बाधित प्राध्यापकाच्या घरातील आणखी तीन महिलांना कोरोनाची लागण झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे .
               शिरोळ तालुक्यात आज जयसिंगपूर 4, घोसरवाड 1, नवे दानवाड 3, गौरवाड 1, हेरवाड 1, तेरवाड 1, कोथळी 1, नांदणी 1 व दत्तवाड 1 असे 14 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. शिरदवाड (ता. शिरोळ) येथील एका 52 वर्षीय कोरोना बाधित इसमाचा मृत्यु झाला . तालुक्यामध्ये आतापर्यंत 164 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून फक्त जयसिंगपूर शहरात या रूग्णांची संख्या 26 झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनाने तालुक्यात दहा जणांचा बळी गेला आहे.
जयसिंगपूर येथील नांदणी रोडला असणार्‍या एका डॉक्टरालाही गुरूवारी कोरोनाची लागण झाली आहे . मागील चार दिवसापासून त्यांना आजारी असल्याने कोल्हापूर येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बाधित असणार्‍या लक्ष्मी पार्क येथील प्राध्यापकाच्या घरातील तीन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे . तरीही तालुक्यातील प्रत्येक गावात स्वच्छता मोहीम व निर्जंतुकीकरण फवारणी मोठया प्रमाणात सुरु आहे .

error: Content is protected !!