शिरोलीत आजपासून सुरू होणार दंडात्मक कारवाई ; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपायोजना

पुलाची शिरोली /ता. ६-प्रतिनिधी

  शिरोली (ता. हातकणंगले ) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आजपासून शिरोली गावात विना मास्क फिरणे. सोशल डिस्टन्स न पाळणे , यासह सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां व्यक्तींवर दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे. ही कारवाई ग्रामपंचायत शिरोली व एम्आयडीसी पोलीस ठाणेच्या संयुक्त विद्यमाने करणार असल्याचे सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव व ग्रामविकास अधिकारी ए. एस् .कठारे यांनी सांगितले.

  ज्या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या भागात सीसीटीव्ही द्वारे निरीक्षण ठेवले जाणार आहे. दुकानदार व नागरिकांनी मास्क वापरून , सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दुकानदारास जागेवर पाच हजार रुपये दंड करून तीन दिवस दुकान सील केले जाणार आहे.
 सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर थुंकल्यास पाचशे रुपये दंड वसूल करून माहिती देणाऱ्यास अडीचशे रुपये बक्षीस दिले जाईल. तसेच अंत्यविधीसाठी पीपीई किट घालून फक्त दहा लोकांनी उपस्थित राहण्याचे आहे . ज्यादा व्यक्ती आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तरी नागरिकांनी कोणतीही दंडात्मक कारवाई होवु नये . यासाठी नागरिकांनी घरी सुरक्षित राहुन सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

 

error: Content is protected !!