पन्हाळा / प्रतिनिधी
गोठे (ता.पन्हाळा) येथील दिपक शंकर पाटील याने (वय ४०), याने पत्नी व तेरा वर्षाच्या मुलासह कुंभी नदीपात्रात आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले. मृत दिपकच्या पत्नीचे नांव वैशाली पाटील (वय ३५) आणि मुलग्याचे नांव विघ्नेश पाटील (वय १४) अशी असुन , या सामुहिक आत्महत्येने पंचक्रोशीत खळबळ उडाली असुन परिसरावर शोककळा पसरली आहे.
मृत पाटील यांनी चिठ्ठी लिहुन ठेवली असुन जीवनात अयशस्वी ठरल्याने स्वखुशीने आत्महत्या करत असल्याचे लिहुन ठेवले आहे. आई ,वडिलांनी चौदा वर्षाच्या मुलाला घेऊन नदीपात्रात उडी टाकून ही आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले.
पाटील दाम्पंत्य दोन मुले, वडील एकूण ५ जणांसह एकत्र राहत होते. काल मध्यरात्रीच्या सुमारास पाटील दाम्पंत्य गोठे नजीकच्या वाटेने चालत जावुन कुंभी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिघांनी दोरीने एकत्र पात्राजवळ बांधुन घेतले.
शेजाऱ्यांनी सकाळी पाटील यांच्या घराची बाहेरुन कडी असल्याचे पाहून घर उघडले. घरात आत जावुन बघितल्यानंतर मोबाईलच्या खाली चिठ्ठी लिहून ठेवलेली सापडली. त्यानंतर शेजाऱ्यांनी व गावक-यांनी आजुबाजुला शोधाशोध केली. मात्र त्यांना कोठेही पाटील दाम्पंत्यातील आढळुन आले नाही. अखेर कुंभी नदी पात्राजवळ त्यांची सर्वांचे चप्पल पहावयास मिळाली. नदी पात्रात सर्वत्र शोधल्यानंतर तिघांचे मृतदेह एकत्र दोरीने बांधलेले आढळुन आले.
मृतदेह सकाळी नऊच्या सुमारास नदीपात्रातुन बाहेर काढले. पाटील दाम्पंत्याची मुलगी साक्षी दिपक पाटील ही इ. १० वीच्या वर्गात शिकत होती . ती आजोळी चिंचवडे ( ता. करवीर ) येथे गावी गेल्याने या घटनेतुन ती वाचली आहे. पुढील तपास कळे पोलीस करीत आहेत.
जीवनात अयशस्वी ठरल्याने स्वखुशीने आत्महत्या …..
जीवनात अयशस्वी ठरलो, आम्हाला माफ करा, कोणालाही जबाबदार धरु नये. प्रदीप घराकडे लक्ष ठेव. संजु, आक्का, अमर, आण्णाला सांभाळा. कोणीही तक्रार करु नये, मी, वैशाली व विघ्नेश स्वखुशीने आत्महत्या करत आहोत. सर्ज्यादा व दिपक, माफ करा, चुकलो. अशा मजकुराची चिठ्ठी घरी मोबाईलच्या खाली लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळून आली आहे.