हातकणंगले /ता. ३०
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रयतेचा राजा छत्रपती शाहु महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक माणगाव (ता. हातकणंगले) येथे कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या मान्यतेने वैष्णवी चॅरीटेबल ट्रस्ट व माणगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त माध्यमातून ग्रामीण भागातील पहिले पन्नास बेडचे अद्यावत कोवीड सेंटरचा लोकार्पण सोहळा साधेपणाने पण उत्साहात संपन्न झाला .

लोकार्पण सोहळा कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख , माजी.आम . डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आला. कोवीड सेटर सुरू करण्यासाठी राजू उर्फ अभय मगदूम यांनी मान्यता मिळविण्यापासुन ते आज सुरु करेपर्यंत अविरत प्रयत्न केले असुन त्यांना प्रशांत गवळी व अरविंद कुगे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.
