महाभयानक कोविड -19 या महामारीसोबत युद्ध सुरू असताना केवळ रुग्णांना व्यवस्थीत उपचार मिळावे . आणि रोगाला आळा बसावा . म्हणून गेले 3 महीने कुंटुंबाची काळजी न करता जिवाची बाजी लावून असंख्य कोव्हिड योध्दे या महामारीच्या विरोधात घट्ट पाय रोवुन उभे आहेत.या रोगासोबत जिवाची पर्वा न करता लढणारे अनेक डॉक्टर, मेडिकल कर्मचारी, पोलीस, पत्रकार, आशा सेविका, सफाई कामगार यासह अनेकांना या रोगाची लागण झाली आहे. तरी सुद्धा कोरोनावर मात करुन जनतेची सेवा करण्यासाठी हे योध्दे पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.
संपूर्ण दिवस पी पी ई किट घालून रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर व मेडीकल कर्मचारी हे दिवस रात्र कोरोनासोबत दोन हात करण्यासाठी तयार आहेत. लोकांनी घरातून बाहेर पडू नये, लाॅकडाऊनच्या काळात लोकांची सुरक्षा व्हावी यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र रस्त्यावर उतरून जनतेची सेवा करत आहेत.
घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्याची चौकशी करून त्याचा अहवाल सरकारला देण्याचे काम करणाऱ्या आशा सेविका व सगळीकडे स्वच्छता राहावी . म्हणून स्वच्छता करणारे सफाई कर्मचारी, अनेक गरीब गरजू लोकांना रोज मोफत अन्नदान करणाऱ्या सेवाभावी संस्था, सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यासह समाजातील अनेक दानशुर देवदूत जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र लढत आहेत.
जागतिक संकटाला तोंड देऊन त्याचा सामना करण्यासाठी सदैव तत्परतेने तयार असणाऱ्या कोव्हिड योद्ध्यांना व त्याच्या कार्याला लाख लाख सलाम.