इचलकरंजीत दोन महिला खासगी सावकारांवर गुन्हा

प्रतिनिधी इचलकरंजी

शहरात खासगी सावकारी करणाऱ्या दोन महिलांवर सोमवारी येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हातकणंगले तालुका सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या पथकाने या दोन महिलांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात त्या बेकायदेशीररित्या खासगी सावरकरी करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सुनीता नेमिनाथ भंबिरे आणि जोत्स्ना विनोद पाटील (रा. तीन बत्ती चार रस्ता चौक, आयजीएम हॉस्पिटल परिसर) असे त्यांची नावे आहे.

अधिक माहिती अशी : सुनीता भंबिरे, ज्योत्स्ना पाटील यांच्या घरावर हातकणंगले तालुका सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने सोमवारी छापा टाकला. यामध्ये त्यांच्या घरी काही व्यक्तींच्या सह्या असलेले अनेक बँकांचे कोरे चेक, कागदपत्रे आणि नोंदी असलेल्या दोन डायऱ्या सापडल्या. या सर्वाच्या पडताळणीअंती भंबिरे आणि पाटील या दोघी बेकायदेशीर सावकारी करीत असल्याचे उघड झाले. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसात त्या दोघींविरोधात बेकायदेशीररित्या खासगी सावकारी करत असल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी दिली.
शहरात फोफावलेल्या खासगी सावकारांची प्रचंड दहशत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कुणीही तक्रार देण्यास पुढे येत नाही. तशीच स्थिती या महिला सावकारांबाबतही होती. मात्र संजयकुमार रायगोंडा सांगले (रा. दानोळी, ता. शिरोळ) यांनी शिरोळ तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकाराचे सहाय्यक निबंधक यांच्याकडे भंबिरे आणि पाटील यांच्या विरोधात तक्रार अर्ज केला होता. छाप्यानंतर या प्रकरणी हातकणंगले तालुका सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाचे

error: Content is protected !!