भाजपाच्या माध्यमातुन कोट्यावधीचा निधी मंजुर : माजी आम. हाळवणकर

हातकणंगलेत अडीच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

हातकणंगले / प्रतिनिधी
नगरपंचायतीमध्ये सत्ता नसतानाही विरोधी बाकावर बसुन हातकणंगले येथील विविध प्रभागांसाठी भाजपाच्या माध्यमातुन कोट्यावधीचा निधी मंजुर करून आणला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला साथ द्या. हातकणंगले पंचक्रोशीतील एकही काम शिल्लक ठेवणार नसल्याची ग्वाही माजी आम. सुरेश हाळवणकर यांनी दिली .
हातकणंगले येथे नगरोत्थान व वैशिष्टपुर्ण योजनेतुन भाजपाचे नगरसेवक असलेल्या पाच प्रभागांसाठी मंजुर झालेल्या अडीच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
हाळवणकर पुढे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील आकुर्डीच्या धर्तीवर वारणेच्या उजव्या कालव्यातुन पाणी उचलुन लक्षीवाडी , बिरदेववाडी , आळते, हातकणंगलेपासुन तारदाळपर्यंतच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध करून संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम करणे. आणि श्रीक्षेत्र रामलिंग , धुळोबा, अलंमप्रभु , कुंथुगिरी व रेणुकासह पंचक्रोशीतील अन्य देवस्थानचे एकत्रित क्लस्टरमध्ये समावेश करून दरवर्षी कोट्यावधीचा विकासनिधी उपलब्ध करून त्या माध्यमातुन या देवस्थानचा कायपालट करणे. ही माझी येणाऱ्या काळातील दोन महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत . त्यासाठी नाम. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातुन लागणारा निधी उपलब्ध करून देण्यास मी कटीबद्ध राहीन.

फोटो ओळ
हातकणंगले – येथील मंजुर झालेल्या अडीच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित माजी आम . सुरेश हाळवणकर , माजी जि . प. सदस्य अरुणराव इंगवले व अन्य मान्यवर.

माजी जि.प. सदस्य अरुणराव इंगवले म्हणाले, पंचवीस वर्षापुर्वीची हातकणंगले शहराची पाणी पुरवठा योजना कालबाह्य झाल्याने लवकरच जलजीवन मिशन योजनेतुन शहरासाठी नवीन पाणी योजना लवकरच मंजुर करून आणणार आहे. आता भाजपाचे नगरसेवक असलेल्या पाच प्रभागांसाठी अडीच कोटीचा निधी मंजुर करून आणला आहे. उर्वरित प्रभागांसाठीही लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.
यावेळी प्रभाग क्रं . ६ ( एकोणचाळीस लाख ), प्रभाग क्रं . ७ ( पंचावन्न लाख), प्रभाग क्रं. ८ ( छत्तीस लाख ), प्रभाग क्रं. ११( एकोणचाळीस लाख) आणि प्रभाग क्रं . २ मधील (चौऱ्याहत्तर लाख ) अशा विविध विकास कामांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत प्रास्ताविक राजु इंगवले यांनी केले . आभार अतुल मंडपे यांनी मानले . यावेळी कार्यक्रमास वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, प्रभारी नगराध्यक्षा सौ. छाया पाटील, नगरसेवक दिनानाथ मोरे , मयुर कोळी , सौ. अरुधंती सुर्यवंशी , रमजान मुजावर , विजय खोत , सौ. रोहीणी खोत, सौ . फारिदा मुजावर , सौ . प्राजक्ता उपाध्ये , अभिजीत लुगडे , आळतेचे उपसरपंच अमित पाटील, बाजार समितीचे संचालक किरणराव इंगवले , निवृत्त पोलीस उपअधिक्षक विष्णु पवार, दिपक वाडकर, सुभाष मोरे, विजय निंबाळकर , मधुकर परीट, सुदेश मोरे , रमेश स्वामी , दीपक कुन्नुरे, सौ . गितांजली कुंभार , मंगेश देवाळे , वैशाली जगताप, सागर लुगडे ,आदि मान्यवरांसह पंचक्रोशी पंचक्रोशीतील पदाधिकारी , कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!