श्री सिध्द सोनूदेव यांचा दर्शन सोहळा उत्साहात

शिरोळ : जांभळी (ता. शिरोळ) येथील प्रसिद्ध श्री सिध्द सोनूदेव यांच्या दर्शन सोहळ्याचे शुक्रवारी जय भवानी चौक, शिरोळ येथे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जय भवानी मंडळ, अब्दुल खलिफ युवाशक्ती, शंभूराजे युवा फ्रेंड सर्कल, निलकंठ उर्फ पिंटू फल्ले युवा मंच, बाल शिवाजी मंडळ, आदर्श मंडळ माळभाग यांच्यावतीने या दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिरोळ शहर व तालुक्यातील भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते. अजिंक्यतारा मंडळ येथे श्री सिध्द सोनूदेव यांचे आगमन झाले. बसस्थानक, छत्रपती संभाजी महाराज चौक, पोस्ट ऑफिस या मुख्य मार्गावरून धनगरी ढोल व इतर वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. अश्वारुढ श्री सिद्ध सोनूदेव यांचे रस्त्याच्या दुतर्फा राहून भक्तगण पुष्पवृष्टी करीत होते. जय भवानी चौकात आतषबाजीने स्वागत करण्यात आले. शिरोळ शहरात प्रथमच श्री सिध्द सोनूदेव यांचे आगमन झाले होते. दर्शनासाठी संयोजकानी नेटके नियोजन केले होते.

error: Content is protected !!